सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना सावंतवाडी येथील जानकीबाई सुतिकागृहात तथा भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात स्त्रीरोगतज्ञ म्हणून पाचारण करण्यात आले आहे. सार्वजनिक सुट्टी सोडून ते या रुग्णालयात सकाळी दहा ते बारा या वेळेत रुग्णांची तपासणी करणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर दुर्भाटकर हे गेले कित्येक वर्ष सेवा देत होते. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाल्यानंतर आता दुर्भाटकर कोठे मिळणार असा प्रश्न नागरिकांना पडला होता. मात्र , आयुर्वेदिक महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर व संस्था सदस्य डॉक्टर मिलिंद खानोलकर व आदेश संचालक मंडळाने त्यांची नियुक्ती केली आहे. यावेळी 13 जुलैपासून ते या रुग्णालयात दाखल होणार आहेत. प्राचार्य विकास कठाणे, डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे डॉक्टर संजय दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले.