बेळगाव : बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने परवरीम, गोवा येथे हृदयरोग तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही तपासणी शनिवार दि. 25 मार्च रोजी गोवा स्कॅन सेंटर परवरीम येथे होणार असून प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित हे दुपारी 2 ते 5 यावेळेत ऊग्णांची तपासणी करणार आहेत. तरी हृदयासंबंधीच्या समस्या असलेल्या ऊग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले आहे. डॉ. एम. डी. दीक्षित हे अरिहंत हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक असून डॉ. दीक्षित यांनी बेळगाव येथील जे. एन. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी मिळवली आहे. तर 1984 मध्ये बळ्ळारी सरकारी मेडिकल कॉलेजमधून एमएस पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी सीव्हीटीएस, डीएनबी, पीएचडी पदवी मिळविली. तसेच डॉ. दीक्षित हे विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे मानद सदस्य आहेत. डॉ. एम. डी. दीक्षित हे हृदयावर रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे कर्नाटकातील पहिले हृदयरोगतज्ञ असून त्यांनी 30 हजारहून अधिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. त्याचबरोबर केवळ 900 ग्रॅम वजन असलेल्या बालकावरही त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. शनिवार दि. 25 मार्च रोजी गोवा स्कॅन सेंटर, पर्वरीम येथे हृदयाची समस्या असलेल्या ऊग्णांची डॉ. दिक्षित तपासणी करणार आहेत. यासाठी हृदयविकार असणारे ऊग्ण, छातीत वेदना असणे, बायपास शस्रक्रियेचा सल्ला दिलेले ऊग्ण, हृदयाच्या झडपांचे आजार, जन्मजात हृदयविकार असणारे ऊग्ण, नवजात शिशू व लहान मुलांमधील हृदयविकार, हृदयाला छिद्र असणारे ऊग्ण, श्वासोच्छ्वासाचा त्रास असणे, हार्ट फेल्युअर ऊग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले आहे.
दीनदयाल स्वास्थ योजना अरिहंत हॉस्पिटलमध्ये सुरू
गोमंतकीय नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या दीनदयाल स्वास्थ योजना आता अरिहंत हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आली आहे. गोमंतकीय नागरिकांसाठी ही योजना फलदायी ठरणार आहे. आता अरिहंत हॉस्पिटलमध्ये ही योजना सुरू झाल्याने गोमंतकीय नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असून हृदयासंबंधी व्याधी असणाऱ्या ऊग्णांवर दीनदयाल स्वास्थ योजने अंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तरी गोमंतकीय नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन अरिहंत हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.