नागरिकांतून तीव्र संताप : आठ दिवसांपासून खोदाई करूनही अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ मुख्य रस्त्यावर गेल्या आठ दिवसांपासून डेनेज पाईपलाईन ब्लॉक होऊन अनेकांच्या घरात डेनेजचे पाणी शिरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. या चेंबरची दुरुस्ती करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी भररस्त्यात चर मारली आहे. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असून ही समस्या सोडविण्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
डेनेजच्या पाईपमध्ये कचरा अडकला आहे. त्या पाईपमधून डेनेजचे पाणी आजूबाजुच्या घरांमध्ये वाहत आहे. खणण्यात आलेल्या चरीमध्येही पाणी साचून आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. महत्त्वाचे म्हणजे काँक्रिटचा रस्ता तयार करताना त्यामध्येच ही डेनेजची पाईप घालण्यात आली होती. त्यामुळे तो काँक्रिटचा रस्ता फोडून डेनेज पाईप दुरुस्त करावी लागत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा उडाला आहे.
…अन्यथा तीव्र आंदोलन
चेंबरचे पाणी अनेकांच्या शौचालयातून बाथरुममध्ये शिरत असल्याने घरात राहणे कठीण झाले आहे. या घाण पाण्यातूनच अनेकांना वाट काढावी लागत आहे. अनेकांच्या घरासमोरही डेनेजचे पाणी साचून आहे. गेल्या आठ दिवसांपासून चरीला कोणतेच संरक्षण दिले गेले नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. याबाबत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा तातडीने याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.