बसवेश्वर चौकातील प्रकार : ठिकठिकाणी ख•s उघडे ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना धोका, दुऊस्ती करून पुढील कामे करण्याची मागणी
बेळगाव : गोवावेस परिसरातील जलवाहिन्या घालण्याचे काम थांबविण्यात आले होते. मात्र आता हे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून, रस्ता खोदण्यात येत आहे. यापूर्वी खोदलेल्या रस्त्याची दुऊस्ती करण्यात आली नाही. ठिकठिकाणी ख•s उघडे ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. वाहनधारकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन विकासकामे राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. खानापूर रोडचे काँक्रिटीकरण बसवेश्वर चौकापर्यंत करण्यात आले आहे. मात्र काँक्रिटीकरण करण्यापूर्वी जलवाहिन्या घालणे आवश्यक होते. पण तशी तरतूद करण्यात आली नाही. 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे निश्चित असतानादेखील जलवाहिन्या घालण्यापूर्वीच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता काँक्रिटीकरण करण्यात आलेले रस्ते फोडून जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. बसवेश्वर उ•ाणपुलापासून चौकापर्यंतचा रस्ता खोदण्यात येत आहे. तिसऱ्या रेल्वेगेटपासून बसवेश्वर चौकापर्यंत जलवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. बसवेश्वर चौकात वाहतूक कोंडी आणि खोदाई करण्यात आल्याने वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामुळे येथील काम बंद ठेवण्यात आले होते. पण आता पुन्हा बसवेश्वर चौकात रस्ता खोदाई सुरू करण्यात आली आहे. चोवीसतास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई केली जात आहे. पण यापूर्वी काँक्रिटीकरणासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला आहे.
खोदलेल्या रस्त्यांची दुऊस्ती करा
जलवाहिन्या घालण्याकरिता खोदाई करताना वाहनधारकांच्या सुरक्षेची दक्षता घेणे आवश्यक आहे. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. खानापूर रोडवर ठिकठिकाणी चरी खोदून सिमेंटच्या पाईप रस्त्यावर आडव्या घालण्यात आल्या आहेत. पण रस्त्याच्या बाजुला खोदण्यात आलेल्या चरी बुजविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना अडचणीचे बनले आहे. वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. खोदण्यात आलेल्या रस्त्याची दुऊस्ती करून पुढील कामे करावीत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.