कोथिंबीर, कांदा दरात घसरण
वार्ताहर /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांद्याचा भाव प्रती क्विंटल 200 रुपयांनी कमी झाला. बटाटय़ाचा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वाढला आहे. भाजी मार्केटमध्ये काही भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. यामुळे काही भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. काही भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.
मागील आठवडय़ात कांद्याची आवक कमी आल्याने भाव प्रती क्विंटल 400 रुपयांनी वाढला होता. यामुळे महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱयांनी कांदा विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये पाठवला होता. शनिवारी कांद्याच्या सुमारे 60 ट्रक दाखल झाल्या होत्या. यामुळे थोडय़ाच प्रमाणात आवक वाढली होती. यामुळे भाव प्रति क्विंटल 200 रुपयांनी कमी झाला.
सध्य बेळगाव जवारी बटाटा आवक संपत आली आहे. इंदोर, आग्रा ठिकाणांहून बटाटा बेळगाव बाजारपेठेत येत आहे. इंदोरमध्येच बटाटय़ाला क्विंटलला 1900 ते 2000 रुपये भाव मिळत आहे. यामुळे इतर बाजारात भाव कमी दराने विक्री होत आहे. यामुळे इंदोरहून बेळगाव बाजारात सहा ट्रक बटाटा विक्रीसाठी आला होता. यामुळे बटाटा दरात 200 रुपये वाढ झाल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
सध्या काही भाजीपाल्यांचे उत्पादन वाढले आहे. इतर राज्यांमधूनही भाजीपाल्याची आवक येत आहे. तालुक्यामध्ये भात पेरणीवेळी कोथिंबीर घातली होती. ती कोथिंबीर व भाजीपाला मोठय़ा प्रमाणात भाजी मार्केटमध्ये येत आहे. बेळगाव भाजी मार्केटमधून भाजीला मागणी असल्याची माहिती भाजी व्यापाऱयांनी दिली.
भाजीपाला प्रति दहा किलो
- ढबू मिरची…….. 400 ते 450 रु.
- इंदस ढबू मिरची.. 350 ते 400 रु.
- बिन्स………….. 500 ते 600 रु.
- कारली………… 150 ते 250 रु.
- वांगी………….. 150 ते 200 रु.
- काटे वांगी……… 180 ते 250 रु.
- दोडकी…………. 180 ते 240 रु.
- कोबी………….. 220 ते 250 रु.
- इंग्लिश गाजर….. 250 ते 300 रु.
- भेंडी…………… 150 ते 200 रु.
- बिट……………. 120 ते 180 रु.
- जवारी काकडी…. 200 ते 250 रु.
- पांढरी काकडी…… 80 ते 120 रु.
- आले…………… 300 ते 380 रु.
- जी-फोर मिरची… 350 ते 400 रु.
- हिरवी मिरची…. 350 ते 380 रु.
- पांढरी मिरची….. 220 ते 260 रु.
- बटका मिरची….. 350 ते 400 रु.
- टोमॅटो प्रति ट्रे … 800 ते 1100 रु.
- दुधी भोपळा प्रति डझन 200 ते 250 रु.
- गोल भोपळा प्रति क्विं.1200 ते 1300 रु.
कांदा भाव प्रति क्विंटल
- गोळी………… 600 ते 1000 रु.
- मीडियम……. 1500 ते 1800 रु.
- मोठवड…….. 1500 ते 1800 रु.
- गोळा………. 1800 ते 2000 रु.
जवारी बटाटा भाव प्रति क्विंटल
- गोळी………….. 500 ते 600 रु.
- मीडियम……. 1200 ते 1600 रु.
- मोठवड…….. 1600 ते 1800 रु.
- गोळा………. 2000 ते 2300 रु.
- इंदोर बटाटा… 2100 ते 2400 रु.
- आग्रा बटाटा… 2100 ते 2300 रु.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी………… 1000 ते 1500 रु.
- शेपू…………… 800 ते 1000 रु.
- पालक…………. 300 ते 400 रु.
- कांदापात………. 300 ते 500 रु.
- लाल भाजी…….. 500 ते 600 रु.
- घटप्रभा कोथिंबीर 300 ते 600 रु.
- बेळगाव कोथिंबीर 200 ते 300 रु.
- चायना कोथिंबीर 200 ते 300 रु.