शहरासह उपनगरांमधून दौडचे आयोजन : प्रत्येक विभागात जाणार दौड
प्रतिनिधी /बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या माध्यमातून यावषी भव्य दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या दरम्यान शहर तसेच उपनगरांमधून दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. दौडचे नियोजन करण्यात आले असून प्रत्येक विभागात दौड जाणार आहे. दौडचा मार्ग पुढील प्रमाणे.
सोमवार दि. 26 रोजीचा दौडचा मार्ग
सोमवारी शिवाजी उद्यान येथून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संतसेना रोड, पाटीदार भवनरोड, शास्त्राrनगर, गुडशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, आठल्ये रोड, महाद्वार रोड चौथा क्रॉस, माणिकबाग रोड, समर्थ नगर, महाद्वार रोड तिसरा व दुसरा क्रॉस, संभाजी गल्ली, एसपीएम रोडमार्गे कपिलेश्वर मंदिरात सांगता.
मंगळवार दि. 27 रोजीचा दौडचा मार्ग
शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथून दुसऱया दिवशीच्या दौडला प्रारंभ होणार आहे. एम. जी. रोड, महर्षि रोड, नेहरु रोड, पहिले रेल्वेगेट, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, गोवावेस स्विमिंग पूल, सोमवार पेठ, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड, हरि मंदिर, चिदंबर नगर, हादुगिरी, विद्यानगर, एसव्ही रोड, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदुर गल्ली, सुभाष गल्ली, हणमण्णावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली, महालक्ष्मी मंदिर, अनगोळ येथे सांगता.
बुधवार दि. 28 रोजीचा दौडचा मार्ग
चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरापासून दौडला सुरुवात होणार आहे. काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली, पी. बी. रोड, आरटीओ सर्कल, शिवाजी नगर, फोर्ट रोड, गांधीनगर, श्री दुर्गामाता मंदिर किल्ला येथे सांगता.
गुरुवार दि. 29 रोजीचा दौडचा मार्ग
सदाशिवनगर येथील बसवाण्णा मंदिरापासून दौडला सुरुवात होणार आहे. पहिला मुख्य क्रॉस, दुसरा क्रॉस, सदाशिवनगर, दुसरा मुख्य क्रॉस, चौथा क्रॉस, हरिद्रा गणेश मंदिर रोड, आंबेडकर नगर, गणेश चौक, मरगाई मंदिर, सदाशिवनगर पहिला मुख्य चौथा क्रॉस, तिसरा क्रॉस, दुसरा क्रॉस, नेहरुनगर तिसरा क्रॉस, रामदेव हॉटेल, गँगवाडी, दुर्गामाता रोड, रामनगर, अशोकनगर, सुभाषनगर, ज्योतिबा मंदिर, शिवबसव नगर येथे सांगता.
शुक्रवार दि. 30 रोजीचा दौडचा मार्ग
श्री दुर्गामाता मंदिर खासबाग येथून दौडला प्रारंभ होणार आहे. भारतनगर पहिला क्रॉस, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगाम्मा मंदिर, भारतनगर (हमाल गल्ली) भारतनगर पाचवा क्रॉस, चौथा क्रॉस, रयत गल्ली, ढोरवाडा, सफार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेन रोड, बाजार गल्ली, मारुती मंदिर तेंग्गीन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेशपेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नूरकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प क्रॉस नं. 3, हरिजनवाडा, हरिमंदिर, विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, संभाजी नगर, पाटील गल्ली मंगाई मंदिर येथे सांगता.
शनिवार दि. 1 ऑक्टोंबर रोजीचा दौडचा मार्ग
धर्मवीर संभाजी चौक येथून दौडला प्रारंभ होणार आहे. किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, अशोक चौक, बसवाण गल्ली, लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, भोई गल्ली, बापट गल्ली, पांगुळ गल्ली, कामत गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर सरदार ग्राऊंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदे खूट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक मारुती मंदिर येथे सांगता होईल.
रविवार दि. 2 ऑक्टोबर रोजीचा मार्ग
नाथ पै सर्कल शहापूर येथील आंबाबाई मंदिरापासून दौडला प्रारंभ होणार आहे. लक्ष्मी रोड, कारवारी गल्ली, लक्ष्मी रोड, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरी नगर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, मर्गम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, संभाजी रोड, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, बसवाण गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठल देव गल्ली, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसूर बसवाण गल्ली, बोलमल गल्ली, खडेबाजार, महात्मा फुले रोड, मिरापूर गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, महात्मा फुले रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, खडेबाजार, मेलगे गल्ली, जेट गल्ली, भोज गल्ली, दाने गल्ली, खडेबाजार दाने गल्ली, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे सांगता.
सोमवार दि. 3 रोजीचा दौडचा मार्ग
काँग्रेस रोड येथील शिवतीर्थ येथून दौडला सुरुवात होणार आहे. ग्लोब टॉकीज रोड, इंनडेपेंडेन्ट रोड, हायस्ट्रीट, चर्चस्ट्रीट, कल्याण स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्टस्ट्रीट, वेस्टस्ट्रीट, हायस्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, चर्चस्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिस मार्केट, तेलगु कॉलनी, के. टी. पुजारी, दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी चौक, दुर्गामाता मंदिर जत्तीमठ (धर्मवीर संभाजी चौक) येथे सांगता होईल.
मंगळवार दि. 4 रोजीचा दौडचा मार्ग
सोमनाथ मंदिर ताशिलदार गल्ली येथून दौडला प्रारंभ होणार आहे. फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनि मंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर रोड, कोनवाळ गल्ली, अनूपम हॉटेल रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, मुजवार गल्ली, कांगले गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदुर गल्ली, तानाजी गल्ली पहिला गेट, महाद्वाररोड, तानाजी गल्ली, समर्थ नगर चौथा व पाचवा क्रॉस, महाद्वाररोड, कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वर ओव्हर ब्रिज, शनि मंदिर येथे सांगता.
बुधवार दि. 5 रोजीचा दौडचा मार्ग
मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून दौडला सुरुवात होणार आहे. नरगुंदकर भावे चौक, श्री महालक्ष्मी मंदिर बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर रोड, कोनवाळ गल्ली, अनसूरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खुट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, कंग्राळ गल्ली मागील बाजू, सरदार्स ग्राऊंड रोड, कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, काली आमराई, कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता होईल.