झज्जर
हरियाणाच्या झज्जर येथे मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.5 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार भूकंपाचा धक्का सकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी जाणवला आहे. या भूकंपाचे केंद्र जमिनीत 12 किलोमीटर खोलवर होते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.