प्रतिनिधी/बेळगाव: हिंदू-मुस्लिम जातीय सलोखा राखण्यासाठी मुस्लिम समाजातील प्रमुखांच्या सर्वसंमतीने आमदार आसिफ सेठ यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला असून ईद मिलाद निमित्त काढण्यात येणारी परंपरागत मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दिवशी न काढता ऑक्टोबर १ रोजी काढण्यात येणार आहे.
अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या सभागृहात विविध मुस्लिम संघटना, अंजुमन-ए-इस्लाम संस्था आणि मुस्लिम समाजाच्या प्रमुखांची ईद मिलाद संदर्भात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत आमदार आसिफ सेठ यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
यंदा सप्टेंबर २८ रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्याने ईद ए मिलादची मिरवणूक त्या दिवशी न काढता ऑक्टोबर १ रोजी काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शहरात शांती सलोखा अबाधित राखण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी सर्वसंमतीने हा निर्णय घेतला आहे.