766 अब्ज रुपये खर्चुन होतेय ‘मिरर लाइन’ची निर्मिती
सौदी अरेबिया 766 अब्ज रुपयांच्या खर्चाद्वारे एक ‘साइडवे स्कायस्क्रॅपर’ तयार करण्याची योजना आखत आहे. ही इमारत सुमारे 120 किलोमीटर लांबीची असणर आहे. यात 50 लाख राहू शकतील असा दावा केला जातोय. या प्रकल्पाला ‘मिरर लाइन’ नाव देण्यात आले आहे. याच्या निर्मिती मोठय़ा प्रमाणात काचेचा वापर करण्यात येत असल्याने हे नाव निवडण्यात आले आहे. याचा आकार जवळपास मॅसाच्युसेट्सइतका असेल आणि ही इमारत एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा लांब असणार आहे.
सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी जानेवारी 2021 मध्ये या विशाल आकाराच्या इमारतीसंबंधी स्वतःच्या योजनांचा खुलासा केला होता. तसेच इजिप्तच्या पिरॅमिडच्या धर्तीवर सौदी अरेबियातील पिरॅमिड्सच्या निर्मितीच्या उद्देशाबद्दल सांगितले होते.
50 वर्षे चालणार काम
साइडवे स्कायस्क्रॅपर ‘मिरर लाइन’ एक वाळवंटी शहर ‘निओम’चा हिस्सा असेल. यात दोन 1600 फूट उंच इमारती असतील आणि ती वाळवंटात परस्परांच्या समांतर असणार आहेत. याच्या निर्मितीकरता 50 वर्षांचा कालावधी लागणार आहे. या इमारतींची स्वतःची हायस्पीड रेल्वेलाइन असणार आहे.
कार्बन न्यूट्रल
विशाल आकाराचा प्रकल्प देशाच्या पश्चिमेत अकाबाच्या खोऱयातून एक पर्वतरांगा तसेच वाळवंटातून जाणार आहे. या इमारतीत एका टोकाकडून दुसऱया टोकापर्यंत जाण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ लागणार आहे. तसेच इमारतींना नुतनीकरणीय ऊर्जेद्वारे संचालित केले जाणार आहे. यात हिरवा पट्टा तसेच घरं आणि शेत देखील असतील. याच्या माध्यमातून 50 लाख लोकांना अन्न मिळू शकणार आहे. येथे राहणाऱया लोकांना तीनवेळच्या जेवणासाठी इमारतीचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. इमारत कार्बन न्यूट्रल असेल आणि यातील स्टेडियम हे जमिनीपासून 1 हजार फूट उंचीवर असणार आहे.