दिल्लीहून दुबईला जात होते विमान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातून दुबईला जात असलेल्या एका विमानाचे पाकिस्तानातील कराची शहरात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. स्पाइसजेटच्या एसजी-11 विमानाने दिल्लीमधून दुबईसाठी उड्डाण केले होते. परंतु मार्गात तांत्रिक बिघाडाचा सुगावा लागल्याने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेण्यात आला. या सर्व घटनेत सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
स्पाइसजेट बी7377 विमान दिल्लीहून दुबईसाठी प्रवास करत होते. इंडिकेटर लाइटमध्ये बिघाड झाल्याचे समजल्याने विमान कराची विमानतळाच्या दिशेने वळविण्यात आले. विमान कराचीत सुरक्षितपणे उतरले असून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे. उड्डाणापूर्वी विमानात कुठल्याही बिघाडाचे संकेत मिळाले नव्हते. विमानतळावर प्रवाशांना सुविधा पुरविण्यात आल्या. स्पाइसजेटकडून दुसरे विमान कराचीसाठी रवाना झाले असून ते प्रवाशांना दुबईमध्ये नेणार आहे.