बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : गेल्या काही महिन्यांमध्ये महिलांवर अत्याचार होण्याची घटना वाढल्या आहेत. तरुणीला जाळ्यात ओढायचे. त्यानंतर त्यांचा खून करण्याचा प्रकार उघडकीस येत आहेत. तेंव्हा राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. शिमोगा येथील रुक्साना नामक तरुणेशी प्रदीप या तरुणाने प्रेम केले. त्यानंतर त्यांना मुलही झाले. त्यानंतर तिला जाळून मारण्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांचे लहान बाळ एका हातगाडीवर सोडून देखील देण्यात आले आहे. यापूर्वी नेहा हिरेमठ हिचाही खून झाला होता. अशा घटना राज्यामध्ये वाढल्या आहेत. तेंव्हा तातडीने अशा संशयितांना कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यासाठी कठोर कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, जनरल सेक्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे, अॅड. महेश बिर्जे, अॅड. शाम पाटील यांच्यासह इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.