क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षणखाते व वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित कॅम्प विभागीय क्रीडा शिक्षकांची बैठक उत्साहात पार पडली.
क्लब रोड येथील वनिता विद्यालय स्कूलच्या सभागृहात आयोजित कॅम्प विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धांच्या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहर शारीरिक शिक्षणाधिकारी जी. बी. पटेल, एल. बी. नाईक, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. निर्मला सनथ उपस्थित होत्या. प्रारंभी शाळेचे क्रीडा शिक्षक नागराज भगवंतण्णवर यांनी उपस्थितांचे स्वागत करून स्पर्धेची माहिती दिली. यावेळी क्रीडा अधिकारी जी. बी. पटेल यांनी 31 ऑगस्टपर्यंत बेळगाव तालुकास्तरीय स्पर्धा पूर्ण कराव्यात, कॅम्प झोनच्या माध्यमिक क्रीडा स्पर्धा सर्व शाळांच्या क्रीडा शिक्षकांच्या मदतीने पूर्ण कराव्यात. त्यासाठी क्रीडा शिक्षकांनी संपूर्णपणे सहकार्य करावे, असे सांगितले. एल. बी. नाईक यांनी यावषीच्या नियमावलीची माहिती दिली. सांघिक खेळ व ऍथलेटीक्स यांचे वेळापत्रक लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन केले. यावेळी क्रीडा शिक्षक संजय चाल्स, प्रशांत देवदनम, साकिब बेपारी, महेश हागिदाळे, शकील कोतवाल, चेस्टर रोझारिओ, लक्ष्मण तुपारे व इतर क्रीडा शिक्षक उपस्थित होते.