Enthusiastic response to blood donation camp at Dandeli Aros
स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली आरोस व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कुल आरोस कोंडुरा तिठा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या रक्तदान शिबिरात एकूण २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले .यावेळी रक्तदान शिबिराचे उद्धाटन आरोस सरपंच शंकर नाईक, दांडेली सरपंच नीलेश मोरजकर, माजी पंचायत समिती सभापती संदिप नेमळेकर , उपक्रमशील शिक्षक तानाजी खोत , अनिल नाईक , सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर , तालुका सचिव बाबली गंवडे , माजी उपसरपंच योगेश नाईक , विश्वनाथ खोत , आपा खोत , सुनिल शेगडे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलनानेकरण्यात आले .यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आला .
यावेळी माजी पंचायत सभापती संदिप नेमळेकर यांनी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याचा कौतुक करताना संजय पिळणकर हे जीएमसी गोवा रक्तपेढीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदान शिबिरे घेत असल्याने विशेष कौतुक केले . तर संजय पिळणकर यांनी स्वराज्य मित्रमंडळ या संस्थेचे कार्य हे अभिनंदन असून याठिकाणी जीएमसीचे रक्तदान शिबिर घेण्यासाठी या तरुणांनी पुढाकार घेतल्यास सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश खोत यांनी केले . तर आभार मंडळाचे अध्यक्ष शिवम बोंद्रे यांनी मानले .
न्हावेली / वार्ताहर