प्रतिनिधी /म्हापसा
हणजूण पोलिसांकडून सोमवारी केलेल्या धडक कारवाईत चोरीस गेलेल्या महागडय़ा मोबाईल्सहित श्रीकांत डी. (शिमोगा-कर्नाटक)याच्या मुसक्मया आवळल्या. त्याच्या ताब्यातील सुमारे आठ लाख रुपयांचे मोबाईल तसेच अन्य वस्तू पोलिसांनी जप्त केल्या.
सुरत-गुजरात येथील पर्यटकाकडून (सध्या राहाणारा-बागा, कळंगूट) हणजूण पोलिसांत रितसर चोरीची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हणजूण पोलिसांकडून पद्धतशीरपणे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सध्या संशयित आरोपी चार दिवसांच्या रिमांडवर हणजूण पोलिसांच्या ताब्यात आहे. संशयित आरोपीच्या ताब्यातील चोरीस गेलेले आठ लाख रुपयांचे महागडे मोबाईल हणजूण पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत.