प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मिलिटरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच अकॅडमीत पार पडला. नाशिक (महाराष्ट्र) तसेच गोवा व कोकणातील विद्यार्थ्यांनी तीन महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला. लोकमान्य सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
अजित गरगट्टी यांनी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसेच पॅरामिलिटरीबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण काळातील तीन महिन्यांचा अनुभव सांगितला. यावेळी व्यवस्थापक रणजित उचगावकर, शारीरिक शिक्षण शिक्षक विनायक कोकितकर, शिक्षिका निकिता बेळगावकर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या माध्यमातून बँकिंग, शिक्षण, विमा, हॉटेल्स, रिसॉर्ट्स अशा अनेक मल्टीपर्पज व्यवसायासोबत सामाजिक उपक्रम राबविले जातात. बेळगाव व खानापूर तालुक्मयातील खेडी दत्तक घेऊन त्या गावांमध्ये रोजगार निर्मिती केली जात आहे. लोकमान्यचे चेअरमन किरण ठाकुर यांनी आजवर हजारो युवक-युवतींना रोजगार देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
2012 मध्ये चन्नम्मानगर, बेळगाव येथे लोकमान्य टेनिंग अकॅडमीची स्थापना झाली. व्हा. चेअरमन अजित गरगट्टी यांच्या नेतृत्वाखाली अकॅडमीची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे. अकॅडमीचे विद्यार्थी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसेच निमलष्करी दलात सेवा बजावत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना भारतीय सेना, वायूसेना, नौसेना व मिलिटरीशी समांतर अशा बीएसएफ, आयटीबीपी, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ यामध्ये भरती व्हावयाचे आहे, अशा विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते.
17 वर्षे 6 महिने ते 23 वर्षापर्यंत (सैनिक), 17 वर्षे 6 महिने ते 25 वर्षापर्यंत (अर्धसैनिक) दलासाठी वयोमर्यादा असते. या वयोमर्यादेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य मिलिटरी टेनिंग अकॅडमी (वेद मंदिर) दुसरा स्टेज, राणी चन्नम्मानगर येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी (0831-2420120 अथवा 07022469543) क्रमांकाशी संपर्क साधावा.