वार्ताहर /जुने गोवे
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बारा वषीय ज्युलिया सलीम खातुन हिचा मृतदेह शनिवारी संध्याकाळी देवगी चोडण येथील मानसीच्या परिसरात सांपडला. तक्रारदार मुलीचा जन्मदात्या पित्यानेच आपण खून केल्याची कबुली देऊन मुलीचा मृतदेह मानसी जवळ ज्या ठिकाणी टाकला होता ती जागा पोलीसांना दाखविली.पोलीसानी मृतदेह ताब्यात घेवुन शवविच्छेदन करण्यासाठी बांबोळी होस्पिटलात पाठविला आहे. 34 वषीय मुलीचे वडील संशयित मोहम्मद सलीम खातुन यांना खुनाच्या आरोपाखाली रितसर अटक करून पाच दिवसांचा रिमांड घेतला आहे.
दरम्यान सोमवारी सकाळी मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे व त्यानंतरच मृत्यू चे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती तपास अधिकार्यानी दिली.जुने गोवे पोलीस स्थानकाचा तात्पुरता ताबा असलेले पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक श्री निखिल पालेकर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास करीत आहे.