ऑनलाईन टीम / मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थखात्याची सूत्रे हाती घेताच आठवडाभरात राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे. आमदारांच्या मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांसाठी प्रत्येकी 25 कोटी किंवा त्याहून अधिक निधी अजित पवारांकडून मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे.
विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामधून अजित पवार गटातील आमदारांना 25 किवा त्यापेक्षा अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपल्याला विकासकामांसाठी 40 कोटी निधी मिळाल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबरच अजित पवारांनी शिंदे गटातील आमदारांनाही विकासनिधी मंजूर करत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.