प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागातर्फे पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. इंटिग्रेशन ऑफ स्मार्ट एनर्जी सिस्टिम फॉर पॉवर नेटवर्क्स या विषयावर माहिती देण्यात आली.
डॉ. राखी कळ्ळीमनी यांनी स्वागत केले. कॉलेजचे प्रमुख डॉ. आर. व्ही. रायकर यांनी विद्यार्थ्यांना नव्या संशोधनाची माहिती होण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरेल, असे सांगितले. आयआयटी शिबपूर येथील माजी प्राध्यापक डॉ. अभिजित चक्रवर्ती म्हणाले, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये विद्यार्थ्यांना नवीन टेक्निक तसेच संशोधनाची माहिती मिळते. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला या ठिकाणी वाव मिळत असतो. स्मार्ट पॉवर सिस्टिममुळे भविष्यात अनेक बदल घडतील, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील यांनी स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम याविषयी माहिती दिली. डॉ. देबराज सरकार यांनी आभार मानले. डॉ. तमालिका चौधरी व उमा कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. श्वेता नंदी व रोसाना जाधव यांनी सूत्रसंचालन केले. 110 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.