प्रतिनिधी /बेळगाव
केपीटीसीएल ज्युनियर असिस्टंट परीक्षा घोटाळाप्रकरणी डीसीआरबीच्या अधिकाऱ्यांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने या परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी झाली होती.
7 ऑगस्ट 2022 रोजी ही परीक्षा झाली होती. इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व मायक्रो चीपच्या माध्यमातून परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अनेकांनी घोटाळा केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी गोकाक शहर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डीसीआरबीचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी यांच्याकडे सध्या या प्रकरणाचा तपास आहे.
किरण सहदेव कोरबू (वय 28) रा. दरुर, ता. अथणी, नागय्या इरय्या हुब्बळ्ळी (वय 26) रा. जक्कनायकनकोप्प, ता. बैलहोंगल, नागाप्पा उद्दाप्पा होसमनी (वय 29) रा. हडगीनहाळ, ता. गोकाक, शशिकांत शिवाप्पा मागी (वय 25) रा. बेनचिनमर्डी, ता. गोकाक, देवराज भीमाप्पा अवली (वय 26) रा. बगरनाळ, ता. गोकाक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अटक केलेल्या सर्व पाच जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे गदगपर्यंत पोहोचले असून एका कॉलेजच्या उपप्राचार्यासह अनेकांची धरपकड झाली आहे.