प्रतिनिधी / पर्वरी
रेईस मागूस येथे वाहन चालकावर खुनी हल्ला केल्या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी गोवा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील 5 संशयित आरोपींना अटक केली आहे. पर्वरी पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी खानापूरकर (कर्नाटक)यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ता. 21 जून 2023 रोजी रेईस मागूस येथे काही अज्ञातांनी आपल्यावर हत्यारांद्वारे हल्ला केला. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. तसेच शरीराच्या इतर भागावर गंभीर जखमा झाल्या.
या तक्रारीच्या अनुषंगाने तपासकामासाठी पथक तयार करून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला. तांत्रिक निगराणी आणि विश्वसनीय स्त्राsतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर पाच दिवसांनंतर प्रकरणाचा छडा लावला आणि संशयित आरोपींची ओळख पटवली.
संशयित आरोपी विशाल राठोड (वय 26, रा. बिर्ला झुआरी नगर, मुरगाव) याला झुआरी नगर येथून तर दुसरा संशयित खुदबोदिन शेख (वय 19 रा. बायना, वास्को) याला वास्को येथून अटक करण्यात आली. तिसरा संशयित मोहम्मद फैजान सय्यद (वय 20 वर्ष रा. बेळगावी, कर्नाटक) याला बेळगाव येथून अटक केली. अन्य दोन आरोपी शिवा सिंग (वय 20) आणि रिशु सिंग, रा. कानपूर, उत्तर प्रदेश यांना मोपा विमानतळावर सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी एक माऊती स्विफ्ट कार आणि एक होंडा डिओ स्कूटर व गुह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी कलम 307,326,506(2),120 ब ,143,147,148,149 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर गोवा अधीक्षक निधिन वालसन आणि उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत गावकर, संकेत तळकर, उपनिरीक्षक सीताराम मलिक, प्रतीक भट प्रभू, कॉन्स्टेबल नितेश गावडे, योगेश शिंदे, महादेव नाईक, उत्कर्ष देसाई, सिद्धेश नाईक पुढील तपास करीत आहेत.