► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांची दिल्लीत भेट घेतली. द्वयींमध्ये झालेल्या बैठकीत द्विपक्षीय पातळीवरील विविध मुद्द्यांचा परामर्ष घेण्यात आला. अलीकडच्या काही महिन्यांत आम्ही विविध पातळ्यांवर चर्चा केल्यामुळे आमच्या द्विपक्षीय संबंधांना गती मिळाली असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो यांची भेट आम्हाला त्यांच्या प्रदेशातील परिस्थिती समजून घेण्याची संधी देते. आम्ही चर्चेसाठी खूप मोठा अजेंडा तयार केला असल्याचे जयशंकर म्हणाले. ह्या मुख्य चर्चेनंतर आता आंतरसरकारी आयोगाच्या बैठकीचीही आम्ही वाट पाहत आहोत, असे सांगण्यात आले.