ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ(Pervez Musharraf) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मुशर्रफ यांच्यावर मागील काही दिवसांपासून दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
मुशर्रफ हे निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी देखील होते. त्यांनी बंड करून सत्ता मिळवली होती. 1999 साली पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना त्यांनी भारताविरूद्ध कारगील युद्ध पुकारले होते. या युद्धामध्ये पाकिस्तानचा दारूण पराभव झाला. या युद्धाची कल्पना पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना देण्यात आली नव्हती. यावरून परवेज मुशर्रफ आणि नवाझ शरीफ यांच्यामध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले होते.
अधिक वाचा : पुणे जिल्ह्यातील नऊ गुन्हेगार एकाच वेळी तडीपार
3 नोव्हेंबर 2007 रोजी मुशर्रफ यांनी संविधान भंग करुन रोजी पाकिस्तानात आणीबाणी जाहीर केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता.