खेड प्रतिनिधी
महाड तालुक्यातील माणगाव-कोस्ते खुर्द येथील मंगेश गायकवाड या 45 वर्षीय तरूणाचा तालुक्यातील आंबवली-वरवलीनजीक खून झाल्याचे महिनाभरानंतर उघडकीस आले होते. या खूनप्रकरणी 2 कामगारांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. मात्र या मारेकरी कामगारांचा अद्यापही सुगावा लागलेला नाही.
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून लाकूडतोड करणारे कामगार खासगी जंगलतोड करणाऱ्या कंत्राटदाराने मागवले होते. 26 डिसेंबर रोजी जंगलतोड झाल्यानंतर कामगारांमधील दोघांमध्ये वाद झाला होता. या वादातून झालेल्या मारहाणीत मंगेश गायकवाड याचा मृत्यू झाला. त्या मृतदेह जंगलमय भागात टाकण्यात आला होता. आठवडाभरापूर्वी त्या मृतदेह कुजलेल्या स्थितीत स्थानिक ग्रामस्थांना आढळला होता. हा मृतदेह मंगेश गायकवाड याचा असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. तरूणांच्या घातपाताच्या शक्यतेने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. मारेकऱ्यांच्या शोधार्थ ठिकठिकाणी पथकेही रवाना झाल्यो समजते. मात्र अद्याप ठोस धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांकडून मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू आहे.