आचरा / प्रतिनिधी-
ऐन चतुर्थी उत्सवात जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीसांना पदोन्नती देत पोलीसांना सुखद वार्ता दिली होती.यात आचरा पोलीस स्टेशनच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.यात आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार महेश देसाई यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी, पोलीस नाईक पदी असलेल्या सौ स्वाती आचरेकर, दिलीप चव्हाण, मनोज पुजारे या तिघांना हवालदार पदी बढती मिळाली. पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी अभिनंदन केले आहे.