वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वक्फ नोकरभरती भ्रष्टाचारप्रकरणी आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार अमानुल्ला खान यांना शुक्रवारी अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांची चार दिवसांची कोठडी मिळविली आहे. शनिवारी सकाळी त्यांना येथील न्यायालयात उपस्थित ठेवण्यात आले. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.
अमानुल्ला खान यांच्याकडे 24 लाख रुपये रोख आणि दोन अवैध पिस्तुले सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. शुक्रवारी त्यांचे निवासस्थान आणि इतर मालमत्तांवर दिल्लीच्या भ्रष्टाचारविरोधी कक्षाने धाडी टाकलेल्या होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या धाडी राजकीय सूडबुद्धीने टाकण्यात येत असल्याचा आरोप केला होता.