वृत्तसंस्था/ केदारनाथ
उत्तराखंडमधील केदारनाथ या जगप्रसिद्ध तीर्थस्थळाच्या भिंतींना सोन्याचा मुलामा चढविण्याचा विचार केला जात आहे. तथापि, या योजनेला तेथील काही पुरोहितांचाच विरोध असल्याचे दिसून आले आहे. या मंदिराच्या गर्भगृहातील भिंतींना हा मुलामा चढविण्याची योजना प्रशासनाने आखलेली आहे.
हिमालयात असलेल्या या मंदिराची स्वतःची विशिष्ट परंपरा असून शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. या परंपरेला सोन्याच्या मुलाम्यामुळे बाधा पोहोचण्याची शक्मयता पुरोहितांच्या एका गटाने व्यक्त केली आहे. सोन्याचा मुलामा चढविण्यासाठी भिंतींमध्ये खोलवर भोके पाडावी लागणार आहेत. त्यामुळे भिंतींच्या सुरक्षेला आणि भक्कमपणाला धोका पोहोचू शकतो. 2012 मध्ये झालेल्या ढगफुटीमुळेही या मंदिराचा एक चिराही निखळला नव्हता. मंदिराची बांधणी अत्यंत मजबूत आहे. अशा स्थितीत कृत्रिमरीत्या मंदिराचा भक्कमपणा धोक्मयात आणण्याची आवश्यकता नाही. सोन्याचा मुलामा चढविला नाही तरीही कोटय़वधी हिंदूंच्या मनात असलेली मंदिरासंबंधीची श्रद्धा कमी होणार नाही. तसेच मुलामा चढविल्याने फारसे काही साध्यही होणार नाही, असे या पुरोहितांचे म्हणणे आहे.
नूतनीकरण आवश्यक
पुरोहितांच्या एका मोठय़ा गटाचा मात्र या योजनेला पाठिंबा आहे. मंदिर अधिक सुशोभित व्हावे तसेच त्याचे नूतनीकरण व्हावे, ही आवश्यकता आहे. सोन्याच्या मुलाम्यामुळे गर्भगृहाची झळाळी वाढणार आहे. भिंतींना धोका निर्माण होण्याची शक्मयता नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ परंपरेचे कारण पुढे करून नूतनीकरण आणि सुशोभिकरण थांबविण्याचे कारण नाही, असे त्यांना वाटते. या योजनेला पाठिंबा देणाऱयांमध्ये ज्ये÷ पुरोहितांचा मोठा सहभाग आहे.
सोन्याचा मुलामा हिंदू परंपरेला अनुकूलच
मंदिरांच्या भिंतींना सोन्याचे वेष्टण देणे ही हिंदू परंपराच आहे. अनेक हिंदू मंदिरांच्या गर्भगृहाच्या भिंतींच्या आतील भागाला सोन्याचे पत्रे लावलेले आहेत. त्यामुळे केदारनाथमध्ये ही योजना लागू केल्यास कोणत्याही परंपरेचे हनन होत नाही. योग्य तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि मंदिराच्या सुरक्षिततेची दक्षता घेऊन नूतनीकरण केल्यास त्याला भक्तांचेही समर्थन मिळेल, अशी भावना या पुरोहितांनी व्यक्त केली. आता प्रशासन कोणता निर्णय घेणार, हे महत्त्वाचे आहे.