प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर येथील शेतकरी कृष्णा परशराम हुंदरे यांच्या शेतामध्ये शेड बांधण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पत्र्याच्या खाली चार साप आढळल्याने येळ्ळूर परिसरात खळबळ उडाली आहे. सर्पमित्र आनंद चिठ्ठी त्यांची पत्नी शिवानी चिठ्ठी आणि सहकारी सुष्मिता नेसरकर यांनी हे साप पकडले.
यामध्ये नर व मादी असे दोन नाग आणि धामण जातीचे दोन नर साप आढळले आहेत. शनिवारी शेडचे काम सुरू असताना पत्र्याच्या खाली साप असल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने त्याची माहिती सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांना देण्यात आली. त्यानंतर सर्व साप त्यांनी पकडले.