प्रतिनिधी/ बेळगाव
भडकल गल्ली येथील बनशंकरी यात्रा महोत्सवाची शनिवारी उत्साहात सांगता झाली. 20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी पहाटे 5 ते सकाळी 7 पर्यंत महाअभिषेक, पूजा, सकाळी 7 ते 8 पर्यंत ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 8 ते 12 पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी 7 वाजता महाआरती करण्यात आली. सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती. पाच दिवशीय यात्रा महोत्सवाची शनिवारी सांगता झाली.