प्रतिनिधी/ सातारा
सदरबझार येथील कांगा कॉलनीत राहत असलेल्या एकाची मोटार सायकल मध्यरात्री त्यांच्या मित्राने जाळली. गाडी जाळणारा मद्यपी असल्याने तो कोणत्या तरी करणाने नेहमी वाद निर्माण करत त्रास देत. गाडीवरून न सोडल्याचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केल्याचे मोटार सायकल मालक संजय दशरथ जाधव(वय 40) यांनी सांगितले. संजय यांनी महेश मोरे(रा. कांगा कॉलनी सदरबझार) यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कांगा कॉलनीत राहत असलेले संजय जाधव हे मजूरी करतात. त्यांनी कष्टातून पैसे जमवत मोटार सायकल (क्रं. एमएच 11 सीआर 0481) विकत घेतली. ही मोटार सायकल पाहून त्यांचा मित्र महेश मोरे हा वारंवार त्यांना पाहिजे त्या ठिकाणी सोडायला लावायचा. याला संजय हे नेहमी विरोध करत. यांचा राग मनात धरून महेश त्यांना शिवीगाळ करून भांडणे करत. तुझ्या गाडीला काय करतो ते बघ असे म्हणून दारू प्राशन करून त्यांना त्रास देत. अशीच गाडीवरून भांडणे झाली. आणि दि. 6 रोजी रात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास महेश यांने गुपचुप येवून गाडी पेटवली. घराबाहेर काही तरी जळत असल्याचे संजय यांच्या लक्षात येतात. ते पळत बाहेर आले. यावेळी महेश हा गाडी जाळून पळताना दिसला. ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. त्यांनी महेश विरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात जावून गुन्हा दाखल केला. तो फरार झाला आहे. या गुह्याचा अधिक तपास महिला पोलीस नाईक एस. आर. सपकाळ करत आहेत.