घरातील लोक वेळीच घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली
वार्ताहर/ खानापूर
खानापूर शिवाजीनगर परिसरातील टीचर कॉलनीतील निवृत्त सैनिक विठ्ठल पाटील यांच्या घरी बुधवारी दुपारी दोन वाजता घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरातील लोक घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मूळचे करजगी गावचे असलेले निवृत्त सैनिक विठ्ठल पाटील गेल्या काही वर्षांपासून आपली मुले नातवंडांसमवेत शिवाजीनगर येथील टीचर कॉलनीत वास्तव्यात आहेत. सकाळी त्यांची सून रेखा यांनी आपल्या घरगुती सिलिंडरवर स्वयंपाक केला होता. दुपारी दोनच्या सुमारास जेवण करण्यासाठी आमटी गरम करण्यासाठी विठ्ठल पाटील यांनी गॅस सुरू केला. दरम्यान रेग्युलेटरमधून आग बाहेर येऊ लागली. विठ्ठल पाटील हे वयोवृद्ध असल्याने त्यांनी आग विझवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु आगीचा झोत मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यांनी घराबाहेर येऊन आग लागल्याची आरडाओरड केली. गल्लीतील लोकांनी त्यांना घराबाहेरच राहण्यास सांगितले. ते बाहेर पडताच काही क्षणातच मोठा स्फोट होऊन सिलिंडर फुटून भडका उडाला. त्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घराचा दरवाजा व खिडक्मयांना लावलेल्या काचा फुटल्या. घराचे वायरिंग जळून गेले. त्यामुळे संबंधित मालकाचे लाखो ऊपयांचे नुकसान झाले आहे.
एचपी गॅस कंपनीचे डिलर, नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीचे मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी भेट दिली व संबंधित कंपनीला या घटनेविषयी कळविण्यात आले आहे. या घटनेमुळे मात्र या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.