न्हावेली / वार्ताहर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव या शाळेला माजी विद्यार्थी पांडुरंग राऊळ यांनी दोन संगणक संच भेट दिले . यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांसह पांडुरंग राऊळ, सचिन राऊळ, पिंटू राऊळ, अंकुश राऊळ, विजय ठाकूर , सच्चिदानंद मेस्री, विवेक नार्वेकर, विश्वनाथ गोसावी मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे , सहशिक्षिका सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, आदी उपस्थित होते . शाळा समितीच्यावतीने राऊळ यांचे आभार मानले .