बेळगावः मराठा मंडळ डेंटल महाविद्यालय आयोजित फाईव्ह ए साईड फुटबॉल स्पर्धेत गोगटे महाविद्यालय संघाला उपविजेतेपद मिळाले. त्यानिमित्त गोगटे महाविद्यालयातर्फे संघाचा खास गौरव करण्यात आला. बॉक्साईट रोड येथील मराठा मंडळ डेंटल महाविद्यालय आयोजित फाईव्ह ए साईड फुटबॉल स्पर्धेत गोगटे महाविद्यालय संघाने अंतिम फेरीत धडक मारली पण अंतिम सामन्यात जीएसएस महाविद्यालय संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. गोगटे शिक्षण संस्थेचे चेअरमन पी. एस. सावकार, महाविद्यालयाचे चेअरमन ए. के. तगारे, प्राचार्य डॉ. एच. एच. विरापूर, जिमखाना चेअरमन डॉ. दत्ता खामकर, क्रीडा प्राध्यापक मंजुनाथ गौडा, नम्रता अंतलमरद यांच्याहस्ते या खेळाडूंचा खास गौरव करण्यात आला. या संघातील खेळाडू योगेश सांबरेकर, गौरव पाटील, सीमन इरगार, मल्हार आरोळकर, प्रणव नंदीहळ्ळी, प्रणीत चिगरे, एस. सुतार, कौशिक पाटील, राज कामू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. एम. एल. लमाणी, बाबुराव शेळके, वंदना नाईक आदी उपस्थित होते.
Previous Articleबहाद्दरवाडीच्या दोन खेळाडूंची मिनी ऑलिम्पिकसाठी निवड
Next Article नित्यानंद कोटीयन मि.बाबूज क्लासिकचा मानकरी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.