बेळगावचा विशाल चव्हाण पहिला उपविजेता, उडुपीचा आनंद सुवर्णा दुसरा उपविजेता, बेळगावचा राजकुमार दोरगुडे उत्कृष्ट पोझर
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य शरीरसौ÷व संघटना, बेंगळूर जिल्हा शरीरसौ÷व संघटना व बाबूज फिटनेस बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शरीरसौ÷व स्पर्धेत उडुपीच्या नित्यानंद कोटीयनने बाबूज क्लासिक हा मानाचा किताब पटकावित 75 हजार रूपयाचे रोख बक्षीस मिळ†िवले. बेळगावच्या विशाल चव्हाणने पहिले उपविजेतेपद व उडुपीचा आनंद सुवर्णाने दुसरे विजेतेपद पटकाविले तर बेळगावच्या राजकुमार दोरगुडेने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला.
बेंगळूर येथे आंबेडकर गार्डन श्रीरामपूरम येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बाबूज क्लासिक राज्यस्तरीय स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार 9 वजनी गटात घेण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातून 250 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल पुढीलप्रमाणे ः 55 किलो गट-1) विठ्ठल चव्हाण बागलकोट, 2) आकाश निंगरानी बेळगाव, 3) राजकुमार दोरगुडे बेळगाव, 4) दर्शन जी. चित्रदुर्ग, 5) नोवेल प्रज्वल एम. द. कन्नडा. 60 किलो गट-1) उमेश गंगणे बेळगाव, 2) प्रेमकुमार शिमोगा, 3) हणमंत एच. बेंगळूर, 4) दिलीप नायक बेंगळूर. 65 किलो गट-1) सुरेश एस. धारवाड, 2) शरिफ ए. के. बेंगळूर, 3) अल्बर्ट बेंगळूर, 4) सागरसिंग बेंगळूर, 5) फारूक फैजान बेंगळूर. 70 किलो गट-1) आनंद सुवर्णा उडुपी, 2) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 3) श्रवणन एच. बेंगळूर, 4) सुनील पाटील बेळगाव, 5) किशोर के. पी. बेंगळूर. 75 किलो गट-1) तापसकुमार नायक चित्रदुर्ग, 2) रवीकुमार एस. बेंगळूर, 3) अक्षय रावळ बेळगाव, 4) विनोद जी. के. तुमकूर, 5) रवी गाडीवड्डर बेळगाव.
80 किलो गट-1) विशाल चव्हाण बेळगाव, 2) केशव ए. बेंगळूर, 3) कार्तिक बेंगळूर, 4) समिर खान बेंगळूर, 5) जॉयजित द. कन्नडा. 85 किलो गट-1) नित्यानंद कोटीयान उडुपी, 2) गजानन काकतीकर बेळगाव, 3) संदीप बंगेरा द. कन्नडा, 4) मंजू शिमोगा, 5) के. श्रीनिवासमूर्ती बेंगळूर. 85 किलो वरील गट-1) नवीन बेंगळूर, 2) बबलू अजय बेंगळूर, 3) अविनाश केएसआरटीसी हासन, 4) अप्पी ए. बेंगळूर.
बाबूज क्लासिक किताबासाठी विठ्ठल चव्हाण, उमेश गंगणे, सुरेश, आनंद सुवर्णा, तापसकुमार नायक, विशाल चव्हाण, नित्यानंद कोटीयान, नवीन यांच्यात लढत झाली. त्यामध्ये नित्यानंद कोटीयान, विशाल चव्हाण व आनंद सुवर्णा यांच्यात तुलनात्मक लढत झाली.
त्यामध्ये बाजी मारत उडुपीच्या नित्यानंद कोटीयानने मि. बाबूज क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला. बेळगावच्या विशाल चव्हाणने मि. बाबूज क्लासिकचे पहिले उपविजेतेपद तर उडुपीच्या आनंद सुवर्णाने मि. बाबूज क्लासिकचे दुसरे उपविजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट पोझर किताबासाठी बेळगावच्या राजकुमार दोरगुडे व उमेश गंगणे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये राजकुमार दोरगुडेने उत्कृष्ट पोझरचा किताब
पटकाविला.
मान्यवरांच्या हस्ते मि. बाबूज क्लासिक विजेत्या नित्यानंद कोटीयानला 75 हजार रूपये रोख, मानाचा किताब, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. पहिल्या उपविजेत्या विशाल चव्हाणला 35 हजार रूपये रोख, चषक व प्रमाणपत्र तर दुसऱया उपविजेत्या उडुपीच्या आनंद सुवर्णाला 25 हजार रूपये रोख व चषक देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट पोझर बेळगावच्या राजकुमार दोरगुडेला 5 हजार रूपये रोख व चषक देवून गौरविण्यात आले.
आशियन पंच अजित सिद्दण्णावर, जे. निळकंठ, उमा महेश, जे. डी. भट्ट, एम. गंगाधर, बसवराज अरळीमट्टी, प्रशांत सुगंधी, मिलींद सालियान, हरिषकुमार, बाबूज व ऍन्ड्रय़ू यांनी पंचांची भूमिका बजावली.