प्रतिनिधी /म्हापसा
‘हर घर जल’ असे प्रमाणपत्र मिळविणारे गोवा हे पहिले राज्य ठरल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम खात्याने ते साध्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने ते प्रमाणपत्र दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आणि पेंदीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्दिष्ट साकार झाल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्यातील प्रत्येक घरात नळाची जोडणी बांधकाम खात्यातफ्xढ देण्यात आली असून पाणी घराघरात पोहोचल्याचे ते म्हणाले. त्यामुळे 100 टक्के ‘हर घर जल’ मिशन गोव्यात पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले.