पर्वरी : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे महाराष्ट्र येथे 17 ते 22 जून 2023 या कालावधीत ’फाउंडेशनल लर्निंग डिजिटल एज्युकेशन रिसर्च आणि कार्याचे भविष्य’ या विषयावरील उ20 प्रदर्शनात गोव्याने भाग घेतला असून जी 20 जनभागीदारी गोवा समग्र शिक्षाचा भाग म्हणून राज्य प्रकल्प संचालक आणि शिक्षण संचालनालयाच्या नेतृत्वाखाली गोवा समग्र शिक्षा आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. शंभू घाडी, सहाय्यक शिक्षण संचालक मनोज सवाईकर, राज्य कार्यक्रम समन्वयक पुष्पाल साखरदांडे , श्रीमती सोनल औलकर, बाळकृष्ण गावस आणि निपुन भारत गोवाचे तांत्रिक सहाय्यक अक्षय काणेकर संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. .या प्रदर्शनात गोवा राज्याने मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र आणि डिजिटल उपक्रमात राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे प्रदर्शन आणि प्रत्यक्षित आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालया तर्फे ’साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावरच्या चौथ्या आणि अंतिम शैक्षणिक कार्यगटाची (िंअंउ) बैठक आयोजनाची पूर्ण तयारी झाली असून सदर बैठक ता. 19 ते 21 जून 2023 या कालावधीत पुणे, महाराष्ट्र येथे होणार आहे. या कार्यक्रमात उ20 सदस्य देश, आमंत्रित देश, उ20 देशांमधील शैक्षणिक संस्था?चे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्था यांचा सहभाग असेल.
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.