नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रात कार्यरत असणारी गोदरेज कन्झुमर प्रोडक्टस् कंपनीने जानेवारी ते मार्च 2023 च्या तिमाहीत 452 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला असल्याची माहिती आहे. सदरचा नफा हा मागच्यापेक्षा 24 टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 363 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. दुसरीकडे कंपनीने 9 टक्के वाढीसह याच अवधीत यंदा 3172 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.