मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लि. यांनी 9 हजार 500 कोटी रुपये विविध प्रकल्पाच्या माध्यमातून प्राप्त होण्याचा अंदाज नुकताच वर्तविला आहे. गेल्या एप्रिलपासून कंपनीने एकंदर 7 बांधकाम प्रकल्प राबविले आहेत. मुंबईच्या सदरच्या कंपनीने आपल्या ताफ्यामध्ये 6 रहिवाशी बांधकाम प्रकल्पांचा आतापर्यंत समावेश केला आहे. अलीकडेच कंपनीने पुढील 12 ते 18 महिन्यामध्ये 7 हजार 500 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.