वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत 22 वर्षीय धावपटू मनिकांता होबलीधरने पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावताना 10.42 सेकंदाचा अवधी घेतला. त्याचप्रमाणे तामिळनाडूच्या गिरीधरानी रविकुमारने महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले.
पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत मनिकांताने 10.23 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळवताना गेली सात वर्षे अबाधित राहिलेला राष्ट्रीय विक्रम उपांत्य फेरीमध्ये मागे टाकला होता. अंतिम फेरीत मनिकांताने 10.42 सेकंदाचा अवधी घेतला. निखील पाटीलने 10.69 सेकंदाचा अवधी घेत रौप्य तर बी. शिवाने 10.70 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक मिळवले. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत तामिळनाडूच्या गिरीधरानीने 11.36 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक, स्नेहाने 11.42 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर पंजाबच्या कमलजित कौरने 11.52 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक मिळवले. पुरुषांच्या 110 मी. अडथळ्याच्या शर्यतीत तेजस शिर्शीने 13.67 सेकंदाचा अवधी घेत