वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची घोषणा : वर्षभरात 1100 कोटींच्या योजना मार्गी
फोंडा : गोवा राज्याला वीज पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी सौर उर्जेसारख्या पर्यायांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. त्यासाठी 150 मेगा व्हॅट सोलर अॅनर्जी निर्मितीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. भविष्यात राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांतील वीज सौर उर्जेवर कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट्या आहे, अशी घोषणा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली. राज्यातील जनतेला चोवीस तास अखंडित वीज पुरवठा देण्याचे आमचे लक्ष्य असून वीज खात्याने त्यादृष्टीने पावले टाकीत वर्षभरात साधारण ऊ. 1100 कोटींची कामे हाती घेतली आहेत. फोंडा वीज उपकेंद्रापासून बाणस्तारी ते माशेलपर्यंत भूमिगत वीज वाहिन्या व इतर सुधारीत योजनेच्या शुभारंभी सोहळ्यात मंत्री ढवळीकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कुंडई औद्योगिक वसाहतीमधील वीज उपकेंद्रावर रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेझिनाल्ड, प्रियोळ जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, कुंडई पंचायतीचे सरपंच सर्वेश जल्मी, वीज खात्याचे मुख्य अभियंते स्टिफन फर्नांडिस, अधीक्षक अभियंते राजीव सामंत, कार्यकारी अभियंते सुरेश नाईक तसेच कुंडई पंचायतीचे पंचसदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत कऊन व शिलान्यासचे अनावरण कऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
फोंडा तालुका भूमिगत वीज वाहिन्यांनी जोडणार
ऊ. 28 कोटी खर्चून हे काम हाती घेण्यात आले असून ते पूर्ण झाल्यानंतर कुंडई औद्योगिक वसाहतीसह माशेल व कुंडई पंचायत क्षेत्रातील वीज पुरवठ्यात अमुलाग्र सुधारणा होणार असल्याचे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. पुढील वर्षभरात संपूर्ण फोंडा तालुका भूमिगत वीज वाहिन्यांनी जोडला जाणार आहे. साधारण ऊ. 300 कोटींच्या या योजनेला रामनवमीपासून म्हणजेच 30 मार्चपासून सुऊवात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संपूर्ण मडकई मतदार संघ मलनिस्सारण प्रकल्पाशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेनंतर भूमिगत वीज वाहिन्या ही दुसरी महत्त्वपूर्ण योजना असल्याचे त्यांनी सांगितले. भूमिगत वीज वाहिन्यांचे काम जलदगतीने होत असले तरी त्याच्या दर्जाशी तडजोड केली जाणार नाही, असेही मंत्री ढवळीकर यांनी नमूद केले.
राज्यातील विशेषत: दक्षिण गोव्यातील खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्यांची योजना स्वागतार्ह असल्याचे आमदार आलेक्स रेझिनाल्ड म्हणाले. मात्र कोट्यावधींच्या या योजनेची कामे दर्जेदार होतानाच त्यानंतरचे मेटेंनन्सही तेवढेच महत्त्वाचे आहे. सुदिन ढवळीकर हे अनुभवी व कार्यक्षम मंत्री असल्याने वर्षभरातच वीज खात्यांमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. वीज व पाणी ही जनतेची प्राथमिक गरज असून त्यात सुधारण घडविण्यासाठी वीज खात्याने हाती घेतलेल्या कामाला लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन दामोदर नाईक यांनी केले. सर्वेश जल्मी म्हणाले, नवीन योजनेमुळे कुंडई औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांपुढील वीज तुटवड्याची समस्या दूर होईल. तसेच कुंडई गावातील लोकांना खंडित वीजेच्या समस्येपासून दिलासा मिळेल. स्टिफन फर्नांडिस यांनी वीज खात्यातर्फे वर्षभरात हाती घेण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. एका वर्षांत 800 कोटींच्या योजना मार्गी लागणे हा गेल्या वीस वर्षांतील विक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. औद्योगिक वसाहतींमधील भार क्षमता वाढीसाठी उचललेली पावले तसेच भूमिगत वीज वाहिन्यांच्या महत्त्वपूर्ण योजनेमुळे प्रवाहात अमुलाग्र सुधारणा व सरकारी महसूलात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत वीज अभियंते केदार मणेरीकर यांनी केले.
रामनवमीपासून मडकई, फोंड्यात भूमिगत वीज वाहिन्यांचा शुभारंभ
मडकई मतदार संघासह फोंड्यातील कुर्टी पंचायत क्षेत्रात भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाचा शुभारंभ रामनवमीपासून होत आहे. यावेळी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. गुऊवार 30 रोजी सकाळी 11 वा. बांदोडा, दुपारी 3 वा. दुर्भाट आगापूर, सायं. 5 वा. कुर्टी खांडेपार पंचायत व सायं. 7 वा. कुंडई पंचायत क्षेत्रात शुभारंभ सोहळा होणार आहे. तसेच रविवार 2 एप्रिल रोजी सकाळी 10 वा वाडी – तळावली, दुपारी 12 वा. कवळे व 3 वा. मडकई पंचायत क्षेत्रात भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामांचा शुभारंभ होणार आहे.