वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीच्या सेक्रेटरी सुनंदा एन. यांना खानापूर तालुक्यातील शिरोली ग्रा.पं.वर पीडीओ म्हणून बढती मिळाल्याबद्दल कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. वतीने त्यांचा नुकताच सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते सुनंदा एन. यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल सुनंदा एन. यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ग्रा. पं. सदस्य सद्याप्पा राजकट्टी, जयराम पाटील, दादासाहेब भदरगडे, बंदेनवाज सय्यद, कल्लाप्पा अष्टेकर, उमेश पाटील, दत्ता पाटील, बाबू दोडमनी, पूनम पाटील, अर्चना पठाणे, रेखा इंडीकर, शकुंतला सिंग, कर्मचारी शंकर मिशी, शंकर हुरुडे, लक्ष्मी कोलकार आदी उपस्थित होते. यल्लाप्पा पाटील यांनी प्रास्ताविक, स्वागत व सूत्रसंचालन करून आभार मानले.