Grand Dasavatari Theater Festival inaugurated in Vengurle
बाळासाहेबांची शिवसेना पक्ष पुरस्कृत : सातेरी कला क्रिडा मंडळ आयोजित दशावतारी नाट्य महोत्सव
दशावतारी कलेला सुमारे 800 वर्षाचा इतिहास असल्याची नोंद आहे. सन 1857 च्या काळात झाशीच्या राणीने कोकणातील पौराणिक कथांवर दशावतारी नाटक करणाऱ्या दशावतारी नाट्य मंडळाना आणून दशावतारी कलेला अभय दिले. हि कला वृद्धींगत होण्यासाठी सातत्याने या भागाचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा दशावतारी नाटक महोत्सव होत आहे. याचा लाभ रसिकांनी बहुसंख्येने घ्यावा. असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी दशावतारी नाटक महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.
वेंगुर्ले येथील श्री देवी सातेरी कला-क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित व बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत वेंगुर्ले सातेरी मंदिर येथे दि. 21 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या भव्य दशावतारी नाट्य महोत्सवाचे उदघाटन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत प्रमुख अतिथी वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक सुनिल डुबळे, उपजिल्हा प्रमुख सुनिल मोरजकर, शहर प्रमुख उमेश येरय, महिला शहर आघाडी प्रमुख अँड. श्रद्धा बावीस्कर, श्रीदेवी सातेरी देवस्थानचे मानकरी रविंद्र परब, यशवंत उर्फ दाजी परब, अरविंद परब, सुधाकर परब, रामदास परब, आनंद परब, परबवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच विष्णू उर्फ पपू परब, डॉ. आर. एम. परब, पार्सेकर दशावतारी नाट्य मंडळाचे संचालक प्रभाकर पार्सेकर, महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचे संचालक भाई शिर्के यांचा समावेश होता.या दशावतारी महोत्सवाचे उदघाटनाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत श्री देवी सातेरी कला-क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष व देवस्थानचे मानकरी सुनिल परब व मंडळाचे पदाधिकारी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
या कार्यक्रमात नगर परीषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी, या भागातील स्थानिक लोककला असलेल्या दशावतार कलेला प्रोत्साहन देण्याचा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. वेंगुर्ले नगरपरिषदे मार्फत लवकरच तीन दिवशीय नाटक महोत्सव भरविला जाणार आहे. त्यात दशावतारी नाटकांनाही स्थान दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी देवस्थानचे जेष्ठ मानकरी रवींद्र परब, श्रद्धा बावीस्कर, उमेश येरम यांनी दशावतारी नाटक कले संदर्भात आपले विचार मांडले.हा दशावतार महोत्सव यशस्वीपणे पार पडण्यासाठी श्री देवी सातेरी कला-क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे वासुदेव परब,जयवंत परब, सहदेव परब, जगन्नाथ परब, रमण परब, संदीप परब, उमेश परब, गजानन परब, संजय परब, महेश परब, सिताराम परब, दिलीप परब, रवींद्र परब, दत्तप्रसाद परब, जयेश परब, जीवन परब यांचे सह कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश येरम यांनी सूत्रसंचालनाचे काम काका सावंत यांनी पहिले.
वेंगुर्ले (वार्ताहर)-