प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे लोकमान्य दिवाळी किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या गडकोटांची माहिती व्हावी या उद्देशाने मागील काही वर्षांपासून बेळगाव शहर व उपनगरांमध्ये किल्ला स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. दरवषी शेकडो शिवभक्त यामध्ये सहभागी होत असतात. त्यांना आकर्षक अशी बक्षिसे देऊन गौरविण्यात येते.
बेळगाव शहर, शहापूर, वडगाव, अनगोळ व टिळकवाडी या विभागांमध्ये स्पर्धा घेतली जाणार आहे. शालेय विद्यार्थी, युवक मंडळे, गणेश मंडळे व सामान्य नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. शिवभक्तांना कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक किल्ला करता येईल, किल्ल्याचे नाव, प्रकार व ऐतिहासिक प्रसंग नमूद करावा लागणार आहे. महिलांसाठी व लहान मुलांसाठी स्वतंत्र किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 14 ऑक्टोबरपासून लोकमान्य सोसायटीच्या कार्यालयांमध्ये अर्ज उपलब्ध असणार आहेत.
30 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी केली जाणार असून, स्पर्धा बेळगाव शहरासाठी मर्यादित असणार आहे. लोकमान्य सोसायटीने पुरविलेला छापील अर्ज वैध मानण्यात येणार आहे. किल्ल्याची सजावट पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य शाखेशी परीक्षणासाठी संपर्क साधायचा आहे. 5 ते 15 नोव्हेंबरदरम्यान किल्ल्यांचे परीक्षण केले जाणार आहे.
लोकमान्य सोसायटीच्या भाग्यनगर शाखा, दुसरा क्रॉस, टिळकवाडी (फोन -2407063), कोरे गल्ली शाखा, शहापूर (फोन- 2407064), कोनवाळ गल्ली शाखा (फोन 2407076), हरि मंदिरसमोर वडगाव शाखा (फोन- 2407056) क्लब रोड शाखा (फोन- 2407057) तसेच 9353012003 किंवा 9353012002 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.