खानापूर : खानापूर तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. मात्र त्यांचा म्हणावा तसा पर्यटनदृष्ट्या विकास झालेला नाही. असोगा हे देखील पूर्वीपासून पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मलप्रभा काठावरील निसर्गरम्य सौंदर्यात वसलेले रामलिंगेश्वर मंदिर व असोगा गावचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी तीर्थस्थळाच्या धर्तीवर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून असोग्याचा कायापालट निश्चित करू. असे मत माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी असोगा येथील रामेश्वर मंदिर उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष जयवंत पाटील होते. भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठल हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल, जि. पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी, वन निगमचे संचालक सुरेश देसाई, धनश्री सरदेसाई, किरण येळ्ळूरकर आदींच्या हस्ते फीत कापून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
Previous Articleकणकुंबी माउलीदेवी यात्रोत्सव आजपासून
Next Article नियती फौंडेशनच्यावतीने थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.