वारणानगर / प्रतिनिधी
१७ ते २५ जून २०२३ मध्ये बर्लिन (जर्मनी) येथे पार पडलेल्या विशेष ऑलिंपिक स्पर्धेत २५ मीटर फ्रिस्टाईल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक देशाला मिळवून दिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली (ता. पन्हाळा) येथील सुवर्णकन्या दीक्षा शिरगांवकर हिची भव्य मिरवणुक कोडोली ते वारणानगर सवाद्याच्या गजरात अलोट जनसागराच्या उपस्थित काढण्यात आली या मिरवणूकी दरम्यान तिचे ठिकठिकाणी सर्वस्तरातील नागरिकानी स्वागत करून सत्कार केला.
आज शनिवार दि. १ जुलै रोजी देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या दीक्षाचे विशेष ऑलिंपिक स्पर्धेनंतर कोडोली येथे प्रथमच आगमन झाले.सोशल मिडीया व प्रसार माध्यमातून या भव्य सोहळ्यास नागरिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते या मिरवणूक व सत्कार सोहळ्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
सुवर्णकन्या दिक्षाची मिरवणूक सकाळी छ.शिवाजी चौक कोडोली ते दिक्षा शिक्षण घेत असलेल्या चैतन्य विद्या मंदिर वारणानगर या मार्गावर उघड्या जीपमधून सवाद्याच्या गजरात पार पडली.
प्रारंभी छ्त्रपती चौकात कोडोलीच्या सरपंच भारती पाटील, उपसरपंच प्रविण जाधव,ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील, सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विशांत महापुरे, माजी सदस्य प्रा.बी.टी. सांळोखे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते अॅड राजेंद्र पाटील, दिक्षाचे प्रशिक्षक अभय डांगे तसेच प्रविण पाटील, वीरेंद्र पाटील,अनिरुध कांबळे, संजय निकम,संदीप कापरे, अभिजित बनसोडे,सौ. नंदा सावंत,माणिक गायकवाड नितीन चोपडे, मनोज गायकवाड व आदि. उपस्थीत नागरीकानी सत्कार करून मिरवणूकीस प्रारंभ झाला.
कोडोली व्यापारी असोसिएशन मार्फत अध्यक्ष बाबा पाटील, सूरज शहा, यासह सर्व व्यापारी सदस्य, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव,शिवसेना शहर अध्यक्ष शैलेश पिसाळ,भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष रविराज गाताडे, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष सागर जाधव व सर्व कार्यकर्ते, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.