बेळगाव : ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटना, निलजी आयोजित भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन मंगळवार दि. 28 मार्च रोजी ब्रह्मलिंग मैदान निलजी येथे आयोजित करण्यात आले आहे. या मैदानाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून कुस्तीशौकिनांना बसण्यासाठी उत्तम सोय करण्यात आली आहे. सदर कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती राष्ट्रीय चॅम्पियन अमित कुमार (दिल्ली) व डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन भावी (सांगली) व कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार (कार्वे) व उदयसिंग रजपूत (सांगली), चौथ्या क्रमांकाची कुस्ती राकेश घाटगे (कोल्हापूर) विरुद्ध चिराग (कलखांब), पाचव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम (शिनोळी) व रवी (संतिबस्तवाड), सहाव्या क्रमांकाची कुस्ती चेतन कोळी (कोल्हापूर) विरुद्ध प्रवीण (निलजी), सातव्या क्रमांकाची प्रेम (कंग्राळी) व गुंडाप्पा (दावणगेरी), आठव्या क्रमांकाची कुस्ती पवन (चिकदिनकोप्प) विरुद्ध पृथ्वीराज पाटील (कंग्राळी) तसेच इतर आकर्षक लढती आयोजित केल्या आहेत.
Previous Articleबेळगावचा एमएसडीएफ संघ विजेता
Next Article धारवाड अ कडे सुवर्ण केएसटीपीए चषक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.