गोव्यातील साखळी फुटबॉल स्पर्धा : आर्जव दो•ण्णावर उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : गोवा येथे एफसी गोवा लिटल गौर्स साखळी फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या एमएसडीएफ संघाने या साखळी स्पर्धेत 40 गुणांसह विजेतेपद पटकाविले. तर सुपर-30 संघाला 36 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आर्जव दो•ण्णावरला उत्कृष्ट गोलरक्षक किताबाने गौरविण्यात आले. गोवा येथे दहा वर्षांखालील एफसी गोवा लिटल गौर्स साखळी फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या एमएसडीएफ संघाने सहभाग घेतला होता. बेळगावसह गोवा व महाराष्ट्रातील 15 संघांना निमंत्रित करण्यात आले होते. ही स्पर्धा प्रत्येक शनिवार व रविवारी खेळविण्यात आली. पहिल्या सामन्यात एमएसडीएफ संघाने एफसी गोवा संघाचा 2-1 असा पराभव केला. बेळगावतर्फे हुसेन जमादारने 2 गोल केले. दुसऱ्या सामन्यात एमएसडीएफने सेंट ब्रिटो गोवा संघाचा 2-0 असा पराभव केला. हुसेन जमादारने 2 गोल केले. तिसऱ्या साखळी सामन्यात डॉन बॉस्को संघाचा 3-1 असा पराभव केला.
च् ााwथ्या सामन्यात एमएसडीएफने सुपर गोवन संघाचा 3-0 असा पराभव केला. पाचव्या सामन्यात एमएसडीएफने गोवन्स चॅम्पस् संघाचा 4-0 असा पराभव केला. सहाव्या सामन्यात एमएसडीएफने सिटी सॉकर्स संघाचा 4-0, सातव्या सामन्यात एमएसडीएफने डेंझिल फ्रँको एफसी संघाचा 7-0 असा पराभव केला. आठव्या सामन्यात एमएसडीएफने चब्बी चिक्स संघाचा 8-0, नवव्या सामन्यात स्टार अॅकॅडमी संघाचा 4-2, दहाव्या सामन्यात टॅलेंट फुटबॉल अकादमीचा 3-0, अकराव्या सामन्यात जीएफडीसी संघाचा 2-0, बाराव्या सामन्यात राम मंदिर संघाचा 4-0, तेराव्या सामन्यात विंटेज-73 संघाचा 4-0 असा पराभव केला. शेवटच्या साखळी सामन्यात दोन्ही तुल्यबळ संघात सामना झाला. एमएसडीएफ विरुद्ध सुपर-30 हा सामना अतिशय रंगतदार झाला. या सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामना बरोबरीत राहिला. साखळी स्पर्धेत एमएसडीएफ संघाने 13 सामन्यांमध्ये विजय संपादन केला तर एका सामना बरोबरीत राहिला. स्पर्धेत 50 गोल केल्याने 40 गुणांसह एमएसडीएफ स्पर्धेतील चॅम्पियन ठरला तर 36 गुणांसह सुपर-30 संघाने उपविजेतेपद मिळविले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एमएसडीएफ व उपविजेत्या सुपर-30 संघाला आकर्षक चषक, रोख रक्कम, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.