बेंगळूर: ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गृह्ज्योती योजनेचे लोकार्पण होणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री के जे जॉर्ज यांनी दिली.
आज बेंगळूर येथे बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपण विरोधी पक्षात असतानाच गॅरंटी योजनेचा प्लॅन आखला होता. त्यावेळी सिद्धरामय्या, डि के शिवकुमार यांचे हस्ताक्षर असलेले गॅरंटी कार्ड्सचे वितरण करण्यात आले होते. दैनंदिन वस्तूं महागल्याने जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण गॅरंटी योजनेबद्दल आधीच विचार केला होता.
जुलै महिन्यापासून गृहज्योती योजनेनुसार ग्राहकांना बिले दिली जात आहेत. आजपर्यंत १.४३ कोटी गृहज्योती अर्जांची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डि के शिवकुमार, एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि गुलबर्गा जिल्हा पालकमंत्री प्रियांक खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहज्योती योजनेचे लोकार्पण होणार आहे.