विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसने जाहीर केलेल्या गॅरंटी योजनांपैकी एक गृहलक्ष्मी योजनेची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १९ जुलैपासून सुरु होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
आज बेंगळूर येथे बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या बद्दल माहिती दिली. गृहलक्ष्मी योजनेसाठी ग्राम वन, बापूजी सेवा केंद्र, कर्नाटक वन केंद्रांवर अर्ज दाखल करता येतील. सोमवारी ही योजना अधिकृतरित्या सुरु होईल. १७ जुलै रोजी याचे लोकार्पण करण्याचे उद्दिष्ट असून यासाठी निमंत्रित राष्ट्रीय नेत्यांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांना वेळ दिला नाही, म्हणजेच 19 जुलै रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते याचे लोकार्पण केले जाईल. आधार कार्डशी जोडलेल्या खात्यात सहमती दर्शवल्यास 17 ऑगस्ट ते १९ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा केले जातील.