क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 12 वर्षाखालील मुलांच्या एएफसी अजमनगर चषक क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना, आनंद अकादमी, रॉजर्स क्लब व लायाज अकादमी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अवनीश हट्टीकर, साईराज चव्हाण, अवनीश बसुर्तेकर, आरुष देसूरकर याना सामनाविर पुरस्कार देण्यात आले.
जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉजर्स क्रिकेट अकादमी संघाने 25 षटकात 6 बाद 281 धावा केल्या. त्यात अवनीश हट्टीकरने शानदार शतक झळकावताना 12 षटकार व 18 चौकारांसह नाबाद 171 धावा तर प्राजक्त शंभूचेने 49 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे अर्जुन प्रधानने 3 गडी बाद केले. प्रत्युतरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स संघाने 25 षटकात 9 बाद 135 धावा केल्या. त्यात प्रितम पिल्लूकरने 25, अर्जुन प्रधानने 19 धावा केल्या. रॉजरतर्फे प्राजक्त शंभूचे व यश कारेकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात लायाज क्रिकेट अकॅडमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 बाद 167 धावा केल्या. त्यात साईराज चव्हाण नाबाद 60, स्वयम खोतने 31, खंडू पाटीलने 25 धावा केल्या. प्रत्युतरादाखल खेळताना एडीफाय स्पोर्ट्स संघाने 25 षटकात 4 गडीबाद 147 धावा केल्या. त्यात समर्थ कोकणेने 65 ,सौरभ हेडाने 29, आर्या रावने 22 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स संघाने युनियन जिमखाना संघाचा 3 गड्यानी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना संघाने 22.3 षटकात सर्व बाद 108 धावा केल्या. त्यात अर्जुन येळळूरकरने 32, अनिश तेंडुलकरने 23 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे अवनीश बसुर्तेकरने 4 गडी बाद केले. प्रत्युतरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्सने 20.3 षटकात 7 बाद 111 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात लक्ष खातायतने 35, इम्तियाज मंडळ व आरुष पुत्रन यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे मोहम्मद हमजा व फरान शेख यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना संघाने 25 षटकात 4 बाद 133 धावा केल्या. त्यात सार्थक एस एमने 41, विश्रुत कुंदरनाडने 27 धावा केल्या. प्रत्युतरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमी संघाने 16.2 षटकात 2 बाद 134 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात अथर्व करडीने 37, आरुष देसुरकरने 34 धावा केल्या.