प्रतिनिधी /बेळगाव
सुळगा-हिंडलगा (ता. बेळगाव) येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला चालना देण्यात आली. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांतून रस्ते विकासासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
खासकरून बेळगाव ग्रामीण मतदार संघातील बहुतेक रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. विकासकामे राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी आतापर्यंत सहकार्य दिलेले आहे. यापुढेही एक आदर्श मतदारसंघ निर्माण करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
यावेळी मनोज कलखांबकर, भागण्णा नरोटी, मल्लाप्पा सुळगेकर, यल्लाप्पा कलखांबकर, निर्मला कलखांबकर, मारुती पाटील, राजेश्री कोलकार, रेखा पाटील, दीपा तोरे, वैष्णवी काटवेकर, वर्षा सावगावकर, महादेव कंग्राळकर, गणपत गडकरी, परशराम होळेण्णावर आदी उपस्थित होते.